Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार १७ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 909

मेष:-
व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

 

 

वृषभ:-
कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. उगाचच भांडणात पडू नका. धैर्याने परिस्थिती हाताळावी. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे.

Manganga

 

मिथुन:-
घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल.

 

कर्क:-
भौतिक सुखाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील.

 

सिंह:-
संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. घरात शांततेचे वातावरण राहील. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल.

 

कन्या:-
अचानक खर्च उद्भवू शकतात. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. सर्वत्र आनंद शोधाल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल.

 

तूळ:-
नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अनावश्यक खर्च कमी करा. अधिकारात वृद्धी होईल. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल.

 

वृश्चिक:-
एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. केलेला संकल्प पूर्ण होईल. अनावश्यक खर्च उद्भवतील. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील.

 

धनू:-
भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आपला आत्मविश्वास कायम ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

मकर:-
व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा.

 

कुंभ:-
व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल.

 

मीन:-
पदोन्नतीचे योग संभवतात. नवीन संधी चालून येऊ शकते. घरात अतिथी जमतील. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!