मुंबईः नारायण राणे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणावरनही आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे म्हणाले, “नारायण राणे यांना शिवसेनेमुळे ते मंत्री, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, त्या शिवसेनेला ते विसरले असल्याची टीका राजन साळवी यांनी केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, नारायण राणे जे आरोप करतात त्यांनी लोकांसमोर आणावे. कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. मात्र ते धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी नारायण राणे यांची लायकी काढत शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणे यांना मंत्रिपद दिले असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात आता राणे आणि ठाकरे गट आणखी वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.