नागपूर: नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैष्णवदेवी नगर येथे एका निर्दयी बापाने स्वतःच्या मुलांना विष देऊन स्वतः सुद्धा आत्महत्या केली. अशोक बेले असे मृतक आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी अशोक बेले आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणाने वाद सुरू असल्याने ते विभक्त राहत होते. मात्र, ठरल्यानुसार दोन्ही मुलं आठवड्यातून एकदा वडीलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. काल दोन्ही मुलांच्या आजोबांनी त्यांना वडिलांकडे सोडले होते. त्यावेळी आरोपीने दोन्ही मुलांना विष दिल व स्वतःला गळफास लावत आत्महत्या केली. मुलांना घेण्यासाठी जेव्हा पत्नी कडील व्यक्ती तिथे पोहचला तेव्हा सगळा घटनाक्रम उघडकीस आला.
दरम्यान, यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.