Latest Marathi News

शाळेतून निघताच अपघात; टँकरखाली सापडून मुख्याध्यापकाचा मृत्यू!

0 367

जालना: जालना शहरातल्या औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या चौकात ट्रॅकरच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने मुख्यध्यापकाचा मृत्यु झाला आहे. रामदास नामदेव जावळे असे या मुख्यध्यापकाचे नाव आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, चंदन झिरा परीसरात असलेल्या नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालयातील आपले काम आटपून ते दुपारी तीनला जालना शहराकडे जात होते. या दरम्यान चौफुलीवर जैन ब्लॉक मोव्हर्स कंपनीचा ट्रॅकर राजूर चौफुलीकडे वळण घेत होता. यावेळी मागच्या टायरखाली दुचाकी अडकली. यामुळे दुचाकीवरून मुख्याध्यापक जावळे हे मागच्या चाकाखाली आल्याने त्याच्या या अपघातात मृत्यू झाला.

Manganga

 

दरम्यान, घटनेची माहिती कळताच चंदणझिरा परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!