मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली होती.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “एखाद्या लोकशाहीत असे 400 किमीचे सहा हजार कोटींचे काम स्वतः प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? एक तर मूळ पद्धत चुकलेली आहे. सध्या कोविड नाही,” त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, “मुंबईतल्या रस्ते कामाचे कंत्राट ठराविक लोकांना मिळाले. हे कार्टलायझेशन आहे. साडेचार ते साडेआठ टक्क्यांदरम्यान यांनी निविदा भरली. प्रत्येकाला एकेक पॅकेट मिळाले. या निविदा ठरवून कोणी कमी, तर कोणी जास्त भरल्या. यात घोळ झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.”