Latest Marathi News

ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे महापालिकेला गांभीर्य नाही?

0 105

माणदेश एक्सप्रेस न्युज I १५ जानेवारी २०२३ I सांगली I कचऱ्याचा प्रश्न सध्या भेडसावत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर हा उपाय असला, तरी त्याबाबत भारतासारख्या देशामध्येही निरुत्साह असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच वर्गीकरण करून तो वेगवेगळ्या कचराकुंडीत टाकण्याची सक्ती करण्यात आली असून ही सक्ती फक्त नागरिकांना आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण नागरिकांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण करून दिला असला तरी त्याचे डंपिंग मात्र महापालिका एकाचा ठिकाणी करत असल्याने, महापालिकाच याला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.

ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंडय़ाचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या आणि काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गाष्टीचा समावेश होतो. पालिका क्षेत्रातील सोसायटय़ा, हॉटेल, व्यापारी संस्था या सर्वानाच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा अशा सक्ती सूचना असून ज्या सोसयटय़ा वर्गीकरण करून कचरा देत नाही, त्याचा कचरा उचलण्यात येणार नाही असे महापालिकेकडून सांगण्यात येत असून कचरा गोळा करणाऱ्या गाड्याद्वारे तशा सूचना ही नागरिकांना करण्यात येतात.

Manganga

नागरिकांनी ओला-सुका कचरा वर्गीकरण करून देवूनही, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका एकाच ठिकाणी डंपिंग करत असल्याने याचे गांभीर्य त्यांना पाहिजे होते. कायदा करणारे यांनी जर कायदा पाळला नाही तर सामान्य माणूस कसा पाळणार.
ॲड. मारुती बुरुंगले

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!