आटपाडी I चिमुकल्यांच्या बाजारात पोलीस निरीक्षक शरद मेमाणेंचा फेरफटका I चिमुकल्यांशी साधला संवाद I शिक्षणाबरोबरच विद्यार्थीनी घेतले अर्थाजनाचे धडे
माणदेश एक्सप्रेस न्युज I दिनांक १५ जानेवारी २०२३ I आटपाडी/बिपीन देशपांडे I मॉडेल स्कूल बनलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये लहान मुलांनी भाजीपाला विविध खाद्यपदार्थ शाळेत जाऊन तो विकण्याचे धडे नुकतच घेतले. मुलांना व्यवहार ज्ञान, पैशाची देवाणघेवाण समजण्यासाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी बाजाराच्या नियंत्रण केले.
या बाजारात भाजीपाला, कोथिंबीर, मटकी, वांगी, पालक, शेवगाच्या शेंगा, टोमॅटो हरभरा डाळी, उसाचे कांडे, तिळगुळ यासह खाद्यपदार्थ पैकी भेळ, वडापाव, बिस्कीट, सोलकढी, व्हेज, नॉनव्हेज बिर्याणी, पाणीपुरी, गाजर हलवा, कोथिंबीर वडी, कुरकुरे, चिरमुरे, फरसाणा, चिंचगोळी, स्टेशनरी साहित्य घेऊन बसली होती. आपले मुले बाजारात मालाची विक्री करण्यासाठी बसल्याने ती खरेदी करण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.

या भाजीपाला बाजारातून लहान मुलांना अनेक गोष्टीचा उलगडा झाला असून या बाजाराचा मुलांनी आनंद घेतला. सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, विस्तार अधिकारी श्री. म्हेत्रे, अभिजीत देशमुख, ॲड. सतीश देशमुख, शाळा व्यवस्थापनचे शुभांगी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या चिमुकल्यांच्या बाजारात पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस कर्मचारी माऊली पवार यांनी फेरफटका मारत चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. या बाजाराचे नियोजन मुख्याध्यापक शिवाजी लेंगरे यांच्यासह शाळेचे सहशिक्षक यांनी नेटकेपणाने केले.