विटा : दिव्यांग प्रवाशाला उद्धट बोलणे आले वाहकाच्या अंगलट : लिहून द्यावा लागला माफीनामा
माणदेश एक्सप्रेस न्युज I १५ जानेवारी २०२३ I विटा/संतोष भंडारे : दिव्यांग प्रवाशाला उद्धट भाषेत बोलून दुसऱ्या गाडीने या असे सुनविणाऱ्या विटा आगाराच्या वाहक श्रीम. कुलकर्णी यांनी माफीनामा सादर केला.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 22 रोजी प्रहार अपंग क्रांतीचे अध्यक्ष श्री. कोळी तासगाव ते सांगली प्रवासासाठी बस मध्ये आले असता त्यांनी वाहक श्रीम. कुलकर्णी यांना बस मधील दिव्यांग सीट मोकळी करून देण्याची विनंती केली होती.

परंतु वाहक श्रीम. कुलकर्णी यांनी श्री. कोळी यांना, ‘उद्धट भाषेत बोलून दुसऱ्या गाडीने या’ असे सुनविले. याबाबत श्री. कोळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. याबाबत विटा आगार प्रमुख उदय पवार यांनी तातडीने याचा अहवाल वरिष्ठकडे पाठवून शहानिशा केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी यांनी वाहक श्रीम. कुलकर्णी यांना पुन्हा चूक ना करण्याच्या अटीवर कोळी यांची माफी मागितली.
यावेळी आगार प्रमुख उदय पवार, वाहतूक निरीक्षक श्री गुरव, तक्रारदार श्री. कोळी, वाहक श्रीम. कुलकर्णी आदी उपस्थित होते. तसेच भाविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून, काळजी घेतली जाईल असे विटा आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.