Latest Marathi News

BREAKING NEWS

पदवीधरांच्या परीक्षा आणि पदवीधरसाठी मतदान एकाच दिवशी : निवडणूक आयोगाने तोडगा काढावा : भाजपच्या ‘या’ आमदाराने केली निवडणूक आयोगाला विनंती

0 248

आटपाडी/प्रतिनिधी : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका ह्या ३० जानेवारीला तर पदवीधरांच्या आरोग्य विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या मतदानाला पदवीधर मुकणार असून याबाबत मोठा पेच निर्माण झाला असून यावर निवडणूक तोडगा काढावा याबाबत आम. गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे. भारत हा युवकांचा देश आहे, या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम ‘पदवीधर’ आमदार करतात. मात्र तब्बल १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे.

Manganga

येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका आहेत. याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परिक्षा होणार आहेत, राज्यातील विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. शिवाय त्या दिवशी दोन सत्रात या परिक्षा पार पडणार आहेत. या सर्व कारणांमुळे तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार ‘पदवीधर’ आमदार निवडणूकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.

लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम निवडणूका करत असतात. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. अशा या गंभीर मुद्दयाची दखल घेवून यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!