ओडिशा: ओडिशाच्या कटकमध्ये मकर संक्रातीच्या मेळाव्यादरम्यान बदांबा-गोपीनाथपूर टी-ब्रिजवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ओडिशाच्या कटक येथील बदांबा-गोपीनाथपूर टी-ब्रिजवर मकर संक्रातीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशाच्या मकरसक्रांतीच्या मेळाव्याला २ लाखांहून अधिक लोक जमले होते. मकर संक्रातीच्या मेळाव्यात ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर लहान मुलांसहित १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याबाबत ठोस माहिती अद्याप समोर आली नाही.