पुणे:महाराष्ट्र केसरी या मानाच्या असलेल्या कुस्तीच्या अंतिम सामन्यात पुण्याचा शिवराज राक्षे विजेता ठरला आहे. शिवराज राक्षेने शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याचा पराभव केला व महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवत मानाची केसरी गदा पटकावली आहे. या अंतिम सामन्याचं आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड पुणे इथे करण्यात आले होते.
माहितीनुसार, सेमी फायनलमध्ये माती विभागातून पै महेंद्र गायकवाडने पै सिंकदर शेखचा पराभव केला. तर गादी विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला.

दरम्यान, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती होती.