नवी दिल्ली: तुर्कीमधील एका मॉडेलला पहिलं चुंबन घेणं चांगलंच महागात पडलं आहे. तावातावात चुंबन घेताना तिची जीभ तुटली. त्यामुळे मॉडेलला तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. हे वृत्त इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, ३४ वर्षीय मॉडेल सेडा एर्सोईने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. सेडा म्हणाली की, मी पहिल्यांदा प्रियकरासोबत डेटवर गेली होती. आम्हा दोघांना फ्रेंच पद्धतीचं चुंबन घेताना नियंत्रण राहिलं नाही. यावेळी माझ्या प्रियकराचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही’. ‘तावातावात चुंबन घेताना माझी जीभ तुटली. त्यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर मला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीभ कापली गेल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मी पहिली व्यक्ती असेल, की चुंबन घेताना जीभ तुटली गेली असेल. हे हसण्यासारखं मुळीच नाही. मला फार वेदना होत आहेत’, असे सेडा पुढे म्हणाली.

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, सेडाने चाहत्यांचे आभार मानताना म्हणाली, ‘मित्रांनो, मी आता ठीक आहे. तुम्ही आपुलकीने काळजी घेण्याचे संदेश पाठवले, त्याबद्दल आभारी आहे. शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली आहे. डॉक्टरांनी जीभेवर शस्त्रक्रिया केली. आता काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितली आहे’.
‘माझ्या प्रियकराला माहीतच नव्हते की, फ्रेंच पद्धतीचं चुंबन कसं घ्यायचं? त्यामुळे ही घटना घडली. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखू शकली नाही. आमची केवळ एक महिन्याची ओळख आहे’, असेही ती पुढे म्हणाली.(सौ. साम)