मुंबई: अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यामुळे आज उर्फीने आंबोली पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी उर्फीची दीड तास चौकशी करण्यात आली. तसेच या प्रकरणाबाबत उर्फीचा जबाब सुद्धा नोंदवून घेतला आहे.
उर्फी पोलिस जबाब म्हणाली, “मी भारताची सन्माननीय नागरिक आहे. मला माझ्या पसंदीने कपडे घालण्याचा, वागण्याचा बोलण्याचा अधिकार आहे तो अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे घालते ते माझ्या पसंदीने घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाहीये. मी जे कपडे घालते ते माझ्या कामाच्या हिशोबाने घालते त्यावरून माझं फोटोशूट होत असत कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात आणि ते व्हायरल होतात ते मी कसे थांबवू,’ अशी माहिती उर्फीने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, मुंबई आंबोली पोलिसांनी उर्फी जावेद हिला आज चौकशीसाठी नोटीस पाठवल्यानंतर दुपारी सव्वा एक वाजता उर्फी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा कोरडे यांनी तब्बल दीड तास उर्फी जावेदची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पावणे तीन वाजण्याच्या सुमारास उर्फी जावेद आंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडली.