गाझीपूर: गाझीपूर येथील सेवराई परिसरात नवविवाहित महिलेचा पतीसह सासू-सासर्यांनी अमानुषपणे छळ केला आणि नंतर बेदम मारून करून तिची हत्या केली. याप्रकरणी नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेच्या पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, गहमर पोलीस ठाण्यांतर्गत देवल गावामध्ये मृत महिलेचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. नवविवाहित महिलेचा पतीसह सासू-सासर्यांनी अमानुषपणे छळ केला आणि नंतर बेदम मारून करून तिची हत्या केली. मृत नवविवाहित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवविवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंड्यासाठी छळवणूक, फसवणूक आणि हत्या अशा प्रकारे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.