नांदेडः शिवसेना ठाकरे गटाच्या एका आमदाराने पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं अशी विनंती केली आहे. यावरून अनेक राजकीय वावड्या उठत आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
अशोक चव्हाण म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे काम मी पाहतोय. सभागृहात त्या प्रभावीपणे काम करतात. त्यांना उत्तम जाण आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या पक्षात जावं, यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. कुठल्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो, हे त्यांनी ठरवायचंय, असे अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर असल्याने पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर संपुष्टात येईल की काय अशी चर्चा आहे. त्यामुळेच आतापर्यंत विविध पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.