नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.
माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ११, साडेअकरा आणि पुन्हा बारा वाजता हे कॉल आले. कॉलमध्ये दाऊदच्या आवाजात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान यानंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.