मुंबई: राज्यात येत्या 30 जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे, यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, “एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करत देवाचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांचे कष्ट महाराष्ट्र पाहत आहे. तसेच, महाविकास आघाडीला टोला लगावत राज्यातील सर्व पाचही जागा भाजप व शिंदे गटाच्या विजयी होतील असाही दावा यावेळी त्यांनी केला.

दरम्यान, मकर संक्रातीनिमित्त खासदार नवणीत राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला.