वर्धा: विवाहितेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करीत तरुणाने बळजबरीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. अखेर त्रस्त होवून पीडितेने याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. राकेश आडे असे आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, विवाहिता ही पतीला न सांगता वर्धा येथील म्हाडा कॉलनीतील रहिवासी तिच्या मैत्रिणीकडे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आली होती. मैत्रिणीच्या आजीला भेट देण्यासाठी पीडिता ही स्वयंपकखोलीत कपडे बदलवित असतानाच आरोपी राकेश आडे रा. म्हाडा कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ याने पीडितेचा विवस्त्र व्हिडीओ स्वत: च्या मोबाईलमध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला. पीडितेने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन पीडितेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलीस ठाण्यात आरोपी राकेश आडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.