बीड: भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने धावत्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने या भीषण अपघातात भाजप नेते मोहन जगताप यांचा 22 वर्षीय पुतण्या जागीच ठार झाला. विश्वजित जगताप असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती असशी कि, माजलगाव येथील भाजपचे नेते व छत्रपती सहकारी कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप हे अन्य एका मित्रा समवेत औरंगाबाद कडुन माजलगावकडे क्रेटा कारने जात होते. याचदरम्यान बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक विश्वजीत जगताप यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची क्रेयटा कार समोर चालत असलेल्या कंटेनरवर धडकल्याने भिषण अपघात झाला.
दरम्यान, अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक मित्र जखमी झाला असल्याची माहिती आहे.