नाशिक: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नाट्यमय घटना घडल्या. तांबे यांच्या खेळीने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अशात आता यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “नाशिकमध्ये जे काही घडले यात कुणालाही दोष देता येणार नाही. तांबे यांनी केलेल्या चुकीला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलता येणार नाही. मात्र जे काही घडले आहे त्यात महाविकास आघाडीमध्ये समन्वय असने गरजेचे आहे. पुढील कोणतीही लढाई लढण्यासाठी समन्वय पाहिजे.”, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा महाविकास आघाडीने कॉंग्रेसला दिली. यात त्यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले. मात्र सुधिर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्षमधून अर्ज भरला आणि मुलासाठी तांबे यांनी माघार घेतली. या सर्वांमुळे नाशिकचे वातावरण चांगलेच नाट्यमय झाले आहे.