पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कुणाचंही घर फोडण्यासाठी भाजपाची स्थापना झाली नाही. इतरांची घरं फोडली गेली. इतर पक्षांनी ती कशी फोडली याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. भारतीय जनता पक्षानी कुणाची घरं फोडलेली नाहीत. अपक्ष म्हणून कोणी पाठिंबा मागितला असेल, तर त्यावर वरिष्ठ स्तरावर पक्ष निर्णय घेईल. भाजपाची संस्कृती ही दुसऱ्याची घरं फोडण्याची नाही, असे ते म्हणाले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, आमचे मित्र बऱ्याच पक्षांमध्ये आहेत. कोणी कोणत्या पक्षात प्रवेश करायचं. कोणी कोणत्या पक्षात विलीन व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपात कोणी येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू,असेही ते म्हणाले.