‘ती इतकी निर्लज्ज बाई आहे समोर येवून सांगते माझा हा भाग दिसला तो भाग…..’:उर्फी जावेदवर ‘यांचा’ हल्लाबोल!
मुंबई:भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर पुन्हा पत्रकार परिषदेत विरोध केला. यावेळी चित्रा वाघ यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘ती इतकी निर्लज्ज बाई आहे समोर येवून सांगते माझा हा भाग दिसला तो भाग दिसला.. तरच त्याच्यावर कारवाई होणार… अशी कोणती बाई म्हणते. त्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी म्हणतात ती त्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ विरोध करत आहेत. कोणता धर्म सांगतो असं उघडं-नागडं फिरा असं सांगतं… ज्या धर्माची उर्फी आहे, ते हिजाबवरुन भांडणं करत आहेत आणि इंथे धर्माचा विषयच नाही. याठिकाणी विषय विकृती आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधला.