मुंबई: आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात आंदोलन पुकारले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे.
माहितीनुसार, राज्यातील काही शहरात आज एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू असून MPSC च्या राज्यसेवा परिक्षेच्या नव्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. MPSC राज्य सेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही, तोवर आम्ही अलका टॉकीज चौकातून जाणार नाही.असा इशारा एमपीएससी विद्यार्थीनी दिला आहे.