मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. या प्रकरणात उर्फी जावेदने चित्रा वाघ यांची महिला आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.

“यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “माझा वाद हा त्या बाईशी नसून तिच्या विकृतीशी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही. तसेच हे माझ्या घरासाठी करत नसून समाजासाठी करत आहे, मात्र मलाच घेरण्यासाठी सगळे उभे राहिले आहेत. तरीही कोणी सोबत नसले तरी मी हा लढा सुरू ठेवणार” असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. त्याचबरोबर हा नंगानाच तुम्हाला मान्य आहे का?” असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.
दरम्यान, या प्रकरणात उर्फी जावेद राज्य महिला आयोगांची भेट घेणार असून या भेटीसाठी ती महिला आयोगाच्या कार्यालयात दाखल झाल्याचीही माहिती समोर आली आहे.