मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद अद्याप संपलेला नाही. उर्फीवर महिला आयोग का तक्रार दाखल करत नाही? चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर असा सवाल उपस्थित केला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. आता यावर आरोप-प्रत्यारोप होत असताना शुक्रवारी उर्फी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
माहितीनुसार, यावेळी तिच्या सोबत तिचे वकील देखील असणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटण्याचा सल्ला यावेळी तिच्या वकीलांनीच तिला दिला आहे. नुकताच उर्फीने महिला आयोगाला तक्रार अर्ज पाठवला असून हा वाद अजून किती दिवस चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फीवरुन चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला काही प्रश्न विचारले होते. त्यावर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती.