Latest Marathi News

BREAKING NEWS

नाशिक अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना CM शिंदेंकडून ‘इतक्या’ लाखांची मदत!

0 403

नाशिक: सिन्नर -शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ आज सकाळी खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

 

माहितीनुसार, नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आले असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Manganga

 

 

दरम्यान, या अपघातात आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून 35 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसंच हा अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!