नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर-शिर्डी राज्य महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातामध्ये १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. खाजगी बस ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. सदरचा अपघात हा सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ वावी-पाथरे गावांच्या दरम्यान झाला.
मयत झालेल्यांमध्ये दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात खासगी बसमध्ये ३५ ते ४५ प्रवासी असल्याची प्रवास करत होते. यातील पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी तसेच शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातील ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने तर, खासगी बस सिन्नरच्या दिशेन येत होती. पाथरे या गावाजवळ हा अपघात घडला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र आता पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बस-ट्रक भीषण अपघात १० प्रवाशांचा मृत्यू pic.twitter.com/k95RFpnLsV
— Mandesh Express / माणदेश एक्सप्रेस (@mandeshexpress) January 13, 2023