Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १३ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,124

मेष:-
निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. अतितिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल.

 

 

वृषभ:-
प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल.

Manganga

 

मिथुन:-
तत्काल निर्णयावर येऊ नका. नोकरीत वरचष्मा राहील. सारासार विचारावर भर द्यावा. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील.

 

कर्क:-
अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल.

 

सिंह:-
सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. आवडीचे पदार्थ चाखाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

 

कन्या:-
मानसिक प्रसन्नता लाभेल. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल.

 

तूळ:-
योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. पोटाचे विकार जाणवू शकतात. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका.

 

वृश्चिक:-
साहस आणि पराक्रमात वाढ होईल. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल.

 

धनू:-
नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. सामाजिक कामाची ओढ लागेल. प्रलंबित येणी मिळतील. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल.

 

मकर:-
मन:शांती लाभेल. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. जुन्या चिंता मिटतील.

 

कुंभ:-
नसत्या भानगडीत अडकू नका. नवीन गुंतवणूक करता येईल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.

 

मीन:-
अति साहस करायला जाऊ नका. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. पचनाचा त्रास संभवतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!