Latest Marathi News

BREAKING NEWS

“जेव्हा नेत्यावर बोलता येत नाही, तेव्हा विरोधक पत्नीवर बोलतात”: अमृता फडणवीस

0 192

मुंबई : अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात अमृता या नृत्य करताना दिसत आहेत. याशिवाय हे गाणं त्यांनी स्वत: गायलं सुद्धा आहे. त्यांचं हे गाणं अनेकांना आवडलं आहे. अनेकांकडून त्यांचं कौतुक केलं जातंय. पण दुसरीकडे काही जणांकडून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातंय. या ट्रोलिंगवरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

अमृता फडणवीस म्हणाल्या, “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही, त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही तेव्हा अनेकदा त्यांच्या पत्नीच्या मागे लागलं जातं. विरोधक तेच करत आहेत, जेव्हा नेत्यावर बोलता येत नाही, तेव्हा विरोधक पत्नीवर बोलतात”, अशी टीका अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे.

Manganga

 

तसेच, “विरोधकांनी माझं नुकतंच प्रदर्शित झालेल्या गाण्यालाही सोडलं नाही. त्यांनी माझ्या मागच्या गाण्यांच्या वेळीही मला सोडलं नव्हतं. पण ते मी समजू शकते की, ते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय क्षेत्रातील स्थानामुळे आहे. आता मला त्याची सवय झालीय. पण तेवढाच मला आनंद आहे. मी सातत्याने करत राहिली आणि लोकांचंसुद्धा सहकार्य वाढत गेलं”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!