मुंबई: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरून वाद सुरु असून, केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र त्याआधीच धनुष्यबाण चिन्हाबाबत खासदार नवनीत राणा यांनी मोठा दावा केला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, “माझा देवावर, हनुमान चालीसावर विश्वास आहे. बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेसोबत आहे. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा ज्यांच्यासोबत आहेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळेल. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले.
दरम्यान, येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची याचा निर्णय होणार आहे.