जळगाव : जळगावात एका कार्यक्रमादरम्यान, भाषण करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “वर्तमान पत्रात, टीव्हीत काय मेसेज जाणार, कुणी माझा काय मेसेज पाठवायचं ठरवलं आहे; याचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकतात. मला त्यांची कीव येते; असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले, केवळ मी बोलून चालत नाही. कुणीतरी त्याची स्कीम तयार करत की याने काही बोलल्यानंतर त्याचा असा अर्थ लावायचा. मस्त प्रोग्राम तयार होतो आणि त्याला इको क्रीयट करणे म्हणतात. यामुळे संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्युज होतो, मी असं बोललो की काय? पण माझीही यंत्रणा मोठी आहे. माझं प्रत्येक भाषण कॅसेट होतं असते; असेही मंत्री पाटील म्हणाले.