औरंगाबाद: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्यानंतर पुण्याचे जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मकर संक्रांतीनिमित्त कुणाशी तुम्हाला गोड बोलायला आवडेल, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर मी वर्षातील 365 दिवस गोडच बोलत असते, असं उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.