मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत युती करणार, अशाही बातम्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान, आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल प्रकाश आंबेडकर खुलासा करताना ते म्हणाले की, जे पक्ष भाजपासोबत युतीत आहेत अशा कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही, आमची आणि शिवसेना पक्षाची युती होणार आहे. याबद्दल मी एकनाथ शिंदेंनाही सांगितले आहे. तसेच, आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहोत. त्याचबरोबर शिंदेनी भाजपा सोडली तर पुढचा विषय होऊ शकतो, असेही वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच खुलासा केल्याने युतीच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.