मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मोठे फेरबदल होणार तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याआधीच हे मंत्रीमंडळ बदलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, १७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत मंत्रीमंडळातील फेरबदलावर अंतिम निर्णय होईल असे म्हटले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं सत्तांतर झाल्यावर शिवसेनेच्या १२ खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट पकडली. त्यामुळे शिंदे गटाकडे दोन मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कुणाचे मंत्रीपद जाणार आणि कुणाला मिळणार हे मंत्रीमडळाचा विस्तार झाल्यावरच समजणार आहे.