जालना: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज, गुरुवारी सिंदखेडराजाला जात असताना जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले.
यावेळीते म्हणाले, मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी निवडणूक लढवली तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, मराठा समाजातील तरुणांनी वेगळा पक्ष काढून काहीही उपयोग नाही, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील असून, त्यांना हटवण्याची मागणी होत आहे. त्यावर उपसमितीसाठी चंद्रकांत पाटील ही योग्य व्यक्ती आहे. त्यांना हटवण्याची मागणी करणारे हे कट्टर मराठा आहेत का, की एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे तपासावं लागेल, असे ते म्हणाले.