Latest Marathi News

“….त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेले ‘मशाल’ चिन्हही जाणार?”

0 412

मुंबई: शिवसेना कोणाची आणि सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी तूर्तास लांबणीवर पडलेली आहे. शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत उद्धव ठाकरेंचा लढा सुरू असतानाच, तात्पुरते चिन्ह मशालही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलेले मशाल चिन्हही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याविरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ठाकरे गटाला समता पार्टीचं मशाल हे चिन्ह दिल्याने मतदार संभ्रमात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला दुसरे चिन्ह दिले जावे, अशी मागणी समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी केली आहे.

Manganga

 

 

दरम्यान, याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधात समता पार्टी दिल्ली हायकोर्टात गेली होती. पण ती याचिका फेटाळून लावली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!