अमरावती : देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री असे म्हणत खासदार नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जणू स्तुतीसुमनेच उधळली आहेत.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. यात शंकाच नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “सर्वांना आपण उपमुख्यमंत्री वाटता. पण, आमची सर्वांची इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात, असे त्या देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाल्या.
दरम्यान त्या अमरावती येथील सभेत बोलत होत्या. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.