न्यूयॉर्क :अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवा ठप्प झाली आहे. विमानांना लँण्डिंगमध्ये प्रोब्लेम येत असल्याची माहिती समोर आलीय. काही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या उद्भवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. दरम्यान, विमानसेवा ठप्प झाल्याने शेकडो भारतीयांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, फेडरल एव्हीएसन अॅडमिनिस्ट्रेशन ही विमानसेवेवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. या संस्थेकडून या सर्व गोंधळावर स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विमानसेवेवर याचा प्रभाव पडल्याची माहिती समोर येत आहे. सिस्टमचं सर्व्हर बिघडलं आहे. त्यामुळे विमानसेवेवर त्याचा फार मोठा परिणाम पडलाय. संपूर्ण देशात जवळपास 25 हजार विमानांमधून प्रवास करणारे लाखो प्रवाशी यामुळे बाधित झाले आहेत. शेकडो विमान सध्याच्या घडीला आकाशात घिरट्या घालत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, संबंधित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जातेय.