Latest Marathi News

BREAKING NEWS

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला राजकारण पुन्हा एकदा तापणार?

0 212

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. तर शिवसेनेच्या ठाकरे गटालाही ही जागा हवी होती. अखेर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी भाजप आणि शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वानुमताने जागांचं वाटप केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

 

माहितीनुसार, विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा तसेच नागपूरची जागा ठाकरे गट लढवणार अशी माहिती नाना पटोले यानी दिली. त्यामुळे आता नागपूरमधून ठाकरे गटाकडून गंगाधर नागाडे उमेदवार असतील.

Manganga

 

 

याशिवाय, मराठवाड्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे उमेदवार असतील. नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसचे सुधीर तांबे उमेदवार असतील. महाविकास आघाडीने कोकणची जागा ही शेकापसाठी सोडली आहे. शेकापचे नेते बाळासाराम पाटील हे कोकण मतदारसंघासाठी निवडणूक लढतील. तर अमरावतीच्या जागेवर काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे उमेदवार असतील.

 

 

दरम्यान, विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून पाच जागांच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कोकण शिक्षक मतदारसंघासाठी, रणजीत पाटील यांची औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी तसेच किरण पाटील यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!