कोलकत्ता: कोलकत्ता विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जात असलेल्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना गुटख्याची पाकिटं सापडली. गुटख्याच्या पाकिटांमध्ये 400 अमेरिकन डॉलर सापडले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, कोलकत्ता विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जात असताना मोठ्या प्रमाणात असलेली पाकीटं पाहून कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी जेव्हा गुटख्याची पाकीटं उघडण्यास सुरुवात केली तेव्हा त्यात तब्बल 400 अमेरिकन डॉलर सापडले. या 400 अमेरिकन डॉलर्सची भारतीय रुपयात गणना केली तर ही रक्कम सुमारे 32.78 लाख रुपये इतकी आहे.अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे.

Acting on intelligence #AIUofficers intercepted a pax scheduled to depart to Bangkok on 08.01.23 after immigration formalities. Search of his checked-in baggage resulted in recovery of US $40O00 (worth ₹3278000) concealed inside Gutkha pouches @cbic_india @PIBKolkata @DDBanglaTV pic.twitter.com/DpxSCL5S3w
— Kolkata Customs (@kolkata_customs) January 9, 2023
दरम्यान, या कारवाईचा व्हिडीओ कस्टम विभागाकडून शेअर करण्यात आला आहे. त्यात अधिकारी गुटख्याची पाकिटं उघडताना दिसत आहेत. तसेच, सध्या पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.