अमरावतीः अमरावतीत विभागातील विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली.यावेळी मागील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मागील महाविकास आघाडी सरकारने वसुलीचे सर्व उच्चांक गाठले. त्या काळात वर्क फ्रॉम होम होते, तसे मंत्रीही वर्क फ्रॉम जेल होते. जेलमध्ये असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नव्हता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले, “12 वर्षांपासून रणजीत पाटील पदवीधर मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. अनेक वर्षांनंतर पहिल्यादा भाजपाला ही जागा निवडून आणता आली.. आपल्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री होता आले.. सध्याच्या सरकारमध्ये राज्यमंत्री नाही त्यामुळे त्यांचा कारभार आम्हाला पाहावा लागतो.. मी मुख्यमंत्री असताना माझ्या अनुपस्थितीत रणजित पाटील यांनी चांगलं काम तेव्हा केलं. पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. आजही सभागृहात पश्चिम विदर्भाचे प्रश्न ते लावून धरतात, असे ते म्हणाले.