“काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे तर त्यांना भाजपचा नाहीतर…..’हा’ नेता आठवतो”!
नागपूरः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने कार्यकर्त्यांसाठी हाथ से हात जोडो.. हे महाअभियान सुरु केले आहे. पण नागपूर काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
माजी आमदार आशिष देशमुख म्हणाले, “काँग्रेस नेते ज्या आविर्भावात वावरत असतात, तो सोडून द्यावा. त्यांनी नम्रपणे जनतेसमोर जावे, घरोघरी जावे, लोकांशी संपर्क साधला पाहिजे, ही काँग्रेस जनांची भावना आहे. तसेच, आज काँग्रेसच्या पडत्या काळात, कोणत्याही काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे तर.. तो भाजप किंवा इतर विरोधी पक्ष आठवत नाहीत. तर काँग्रेसचाच दुसरा नेता आठवतो. ही स्थिती बदलल्याशिवाय काँग्रेसला यश येणं कठीण आहे, असे वक्तव्य आशिष देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचं मतात रुपांतर करणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.