जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले.
माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये LOC जवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आणि दोन ओआर (अन्य रँक) यांचा समावेश असलेल्या पथकावर बर्फ कोसळला. पथकातील तिनही जवान खोल दरीत कोसळले. यात ते शहीद झाले. तिघा जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

दरम्यान, नायब सुभेदार परषोतम कुमार, हवालदार अम्रिक सिंह, शिपाई अमित शर्मा अशी माछिल सेक्टरमध्ये शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.