मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली. दरम्यान, ज्यावेळी ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले, त्यावेळी मुश्रीफ हे घरी नव्हते. ते मुंबई येथे कामानिमित्त आले होते. ईडीने छापेमारी केल्याचं कळताच, हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.
हसन मुश्रीफ म्हणाले, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरून मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. तसेच यापूर्वी देखील माझ्या घरावर छापे पडले होते. त्यावेळी मी ईडीला पूर्ण माहिती दिली आहे. आज पुन्हा त्यांनी छापेमारी का केली हे आपल्याला माहित नाही. याशिवाय त्यांनी कोणत्या हेतून ही कारवाई हेही मला कळालं नाही, याची माहिती मिळताच, मी ती प्रसारमाध्यमांना देईन, अस मुश्रीफ यांनी स्पष्ट सांगितले आहे.

दरम्यान, कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केलेयावरून विशिष्ट समाजावर कारवाई केली जात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.