पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध केला असता, त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी जुबेर (वय २१ वर्ष) याला पोलिसांनी अटक केली असून शबाना (वय २९ वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर याची मृत शबाना हिच्यावर वाईट नजर होती. मंगळवारी (१० जानेवारी) घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने वहिनीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला वहिनीने विरोध केला असता, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. तसेच, हत्येनंतर आरोपीने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.

दरम्यान, याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पुलवामा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.