Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन!

0 440

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच, मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवनमध्ये ठेवण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Manganga

 

दरम्यान, नाशिक येथील काँग्रेस भवनात बुधवारी छाजेड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!