Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

0 838

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Manganga

काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!