आटपाडी : आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांचे पती डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
डॉ. प्रतापसिंह बेरगळ हे आटपाडी तालुक्यातील घटनिकी-बेरगळवाडी येथील रहिवासी होते. बनपुरी येथे त्यांचा स्वतःचा दवाखाना होता. 2016 झाली झालेल्या पंचायत समितीच्या घरणिकी गणातून त्यांच्या पत्नी डॉ. भूमिका बेरगळ या विजयी झाल्या होत्या. त्यांनी आटपाडी पंचायत समितीचे सभापती पदही भूषवले होते.
डॉ. प्रतापसिंह बेरगळ यांच्या अकालीन निधनाने हळहळ व्यक्त होत असे असून आणि काही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.