मुंबई: मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाची भारतात मोठया आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते. यादिवशी लोकं आपल्या ओळखीच्या माणसांच्या हातावर तीळ-गूळ देतात, ते देताना, ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं आर्वजून सांगतात. शिवाय या सणाचा महिलां वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. दरम्यान यादिवशी भारतीय संस्कृतीत अशुभ मानला जाणारा काळा रंग यादिवशी मात्र आवर्जून वापरला जातो.
माहितीनुसार, या सणाच्या दिवशी काळी कपडे परिधान केली जातात. कारण, पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. हे झालं कथेतील कारण, मात्र, यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे, पांढरा रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही, त्याप्रमाणे काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांतीचा सण हा ऐन हिवाळ्यात येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे आपणाला थंडीचा जास्त त्रास होऊ नये, म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे घातली जातात. शिवाय आपल्या शरीराला उष्णता मिळावी शरीर उष्ण राहावं म्हणून या सणाला तिळगूळ वाटले जातात याचं कारण हेच की सणाच्या निमित्ताने आपल्या शरीरात तिळाचे काही तत्व जावेत आणि आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं.

दरम्यान तज्ञानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करुन निरोप दिला जातो असंही सांगितलं जातं. म्हणून या सणाला आवर्जून काळ्या रंगाला मान दिला जातो