नाशिक : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी पडळकर म्हणाले, “बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही. शरद पवार हे जाणता राजा नाही, तर नेमता राजा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

तसेच, यांनी पैसे कुठं नेले. एक हजार कोटी बारामतीला. तिथं एकही बिबट्या नाही. मग, ही चोरी नाही तर काय, तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली. ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला,असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.